एलआयसीच्या विमा सखी योजनेसाठी 18 ते 50 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. मात्र, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.या एलआयसी योजनेत महिलांना तीन वर्षांसाठी एलआयसी एजंट होण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर पदवीधर विमा मित्रांनाही एलआयसी एजंट होण्याची संधी दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षी प्रत्येक महिलेला दरमहा 7000 रुपये दिले जातात.दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6000 रुपये होते. तिसऱ्या वर्षी महिलांना दरमहा 5000 रुपये दिले जातात. जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.