महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर बँकेचा मेसेज येतो. यावर १५०० रुपये क्रेडिट असा मेसेज येतो. जर हा मेसेज आला असेल तर तुम्हाला पैसे आले आहेत. याचसोबत तुम्ही तुमच्या बँकिंग अॅपवरुनही पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात.ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊन अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते चेक करा. जेणेकरुन तुम्हाला समजेल की पैसे जमा झालेत की नाही.

जर लाडक्या बहि‍णींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर त्यांचे अर्ज कदाचित बाद झालेले असू शकतात. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असेल म्हणून त्यांना हे पैसे आले नसतील. जर तुमचे अर्ज बाद झाले असतील तर पुढचा कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये.