जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.नंतर ‘नवीन शेतकरी नोंदणी’वर क्लिक करा. आणि आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे पडताळणी करा.संपूर्ण आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा. असे केल्याने तुमची अर्जप्रक्रिया पूर्ण होईल.
दरम्यान, पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न घालवता त्वरित नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकेल. सरकारच्या या योजनेमुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर होण्यास मदत होईल.