प्रवाशांना अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकिटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे हेदेखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसंच, एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अ‍ॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आलीय. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.