ई-पीक पाहणी झाली का नाही हे पाहण्यासाठी काय कराल?
१) खाली दिलेल्या लिंकवरून ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN
२) डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करा सगळ्या परमिशन Allow करा.
३) पुढे तुम्हाला महसूल विभाग निवडा असे दिसेल त्यात तुम्ही तुमचा महसूल विभाग निवडा.
४) त्यानंतर खालील बाणावर क्लिक करा.
५) पुढे लॉगीन पद्धत निवडा. ह्यात शेतकरी म्हणून वर क्लिक करा.
६) पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका.
७) पुढे तुम्ही तुमचे खाते जोडले असेल तर खाते नंबर निवडा. (खाते नंबर जोडला नसेल तर सर्व माहिती भरून तो जोडा)
८) खाते नंबर निवडल्यानंतर ४ अंकी संकेतांक नंबर टाका. (संकेतांक विसरला असेल तर खाली संकेतांक विसरलात? ह्यावर क्लिक करा तुमचा चार अंकी संकेतांक नंबर दिसेल तो तुम्ही वर टाका.)
९) संकेतांक नंबर टाकून खालील बाणावर क्लिक करून पुढे गेल्यावर एकूण ६ पर्याय दिसतील.
१०) या पर्यायांमध्ये शेवटचा पर्याय गावाचे खातेदारांची पिक पाहणी हा पर्याय निवडा.
११) पुढे तुम्हाला तुमच्या गावातील सर्व खातेदारांची नावे दिसतील यात तुमचे नाव शोधून त्यापुढे डोळ्यासारख्या चिन्हावर क्लिक करा तुमची पिक पाहणी झाली का नाही ते कळेल.८) खाते नंबर निवडल्यानंतर ४ अंकी संकेतांक नंबर टाका. (संकेतांक विसरला असेल तर खाली संकेतांक विसरलात? ह्यावर क्लिक करा तुमचा चार अंकी संकेतांक नंबर दिसेल तो तुम्ही वर टाका.)
९) संकेतांक नंबर टाकून खालील बाणावर क्लिक करून पुढे गेल्यावर एकूण ६ पर्याय दिसतील.
१०) या पर्यायांमध्ये शेवटचा पर्याय गावाचे खातेदारांची पिक पाहणी हा पर्याय निवडा.
११) पुढे तुम्हाला तुमच्या गावातील सर्व खातेदारांची नावे दिसतील यात तुमचे नाव शोधून त्यापुढे डोळ्यासारख्या चिन्हावर क्लिक करा तुमची पिक पाहणी झाली का नाही ते कळेल.