नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे.
अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की, “उमेदवारांनी सेवेत सातत्य राखावे. जर नंतर कामात कोणत्याही प्रकारची तक्रार आढळली तर उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी अशी विनंती केली आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात त्यामुळे उमेदवारांना तपशील पाहण्यासाठी बँकेची वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.