लाडक्या बहिणींना ७ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केली होती. या योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांना ३००० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेतून ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. अर्जांची पडताळणी केल्यानंतर या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे त्यांना योजनेचा हप्ता मिळणार नाही.
लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु आता या अर्थसंकल्पात तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. आम्ही लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पात २१०० रुपये देऊ, अशी घोषणा केली आम्ही कधीच केली नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या.