लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. एकूण ५ टप्प्यांमध्ये ही पडताळणी होणार आहे. यात ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कर भरतात त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. महिला जर सरकारी नोकरी करत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही.तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.