अशी आहे प्रक्रिया
शेतकऱ्यांना आधार कार्डनुसार जर फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर करायचा.
शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर केल्याबरोबर त्या शेतकऱ्याची नोंदणी केल्याप्रमाणे माहिती दाखवली जाईल. या शेतकऱ्याचा जो युनिक आयडी बनलेला असेल, तो युनिक आयडी दाखवला जाईल.
सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नसल्याने तुम्ही नोंद केलेली माहिती दाखवली जाईल.
या ठिकाणी आपल्याला View Details असा पर्याय दाखवला जाईल.
यावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती दाखवली जाईल.
त्याचबरोबर वरील बाजूस Generate pdf किंवा Download pdf असा पर्याय देखील दिसेल.
या Download pdf वर क्लिक करून त्याची प्रिंट शेतकऱ्याला देऊ शकता.