संचार साथी पोर्टलला भेट द्या:
आपल्या इंटरनेट ब्राउझरमध्ये https://sancharsaathi.gov.in ही लिंक उघडा.
‘Know Your Mobile Connections’ निवडा:
होमपेजवर ‘Citizen Centric Services’ अंतर्गत ‘Know Your Mobile Connections’ किंवा ‘तुमचे मोबाइल कनेक्शन जाणून घ्या’ हा पर्याय निवडा.
मोबाइल नंबर:
उघडलेल्या पृष्ठावर आपला सक्रिय मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
ओटीपी:
आपल्या मोबाइलवर आलेला ओटीपी (One-Time Password) प्रविष्ट करून ‘लॉगिन’ किंवा ‘प्रवेश’ बटणावर क्लिक करा.
सिम कार्ड्सची यादी पहा:
प्रवेश केल्यानंतर, आपल्या नावावर नोंदणीकृत सर्व सिम कार्ड्सची यादी दिसेल. या यादीतील नंबर तपासा आणि अनोळखी किंवा वापरात नसलेले नंबर ओळखा