सोमवारपासून म्हणजे तीन मार्चपासून फेब्रुवारीचा हाप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे.

2100 रुपये कधी मिळणार?

लाभार्थी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हाप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे