२० टक्के बीजभांडवल योजनेमध्ये ७५ टक्के बँक कर्ज उपलब्ध करून देते. २० टक्के रक्कम महामंडळाची असते. तर लाभार्थी हिस्सा म्हणून पाच टक्के लाभार्थ्याला भरावे लागतात. महामंडळाची २० टक्के रक्कम लाभार्थ्यांला उद्योगासाठी वापरता येते.गावातील महिला किंवा पुरूष एकत्र येऊन उद्योग स्थापन करण्याच्या तयारीत असतील तर त्यांना महामंडळामार्फत ५० लाख रूपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महामंडळाने जिल्ह्यातील सहा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे, हे विशेष.
कर्जासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. कर्जासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती दिली आहे. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कर्ज उपलब्ध होते. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच महामंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेता येते हे विशेष.
इतर मागास प्रवर्गातील युवकांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी सवलतीत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्ज योजनेचा लाभजिल्ह्यातील युवकांनी घ्यावा. उद्योग स्थापन करून स्वावलंबी व्हावे.