पीएम किसानचा हप्ता कसा चेक करायचा?
जर तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे बरोबर सबमिट केली असतील. तुमचे ई-केवायसी पूर्ण असेल तर पीएम किसानचा १९वा हप्ता नक्की मिळेल. या हप्त्याची स्थिती तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.
पीएम किसान स्टेटस कसे तपासावे?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही तुमची स्टेटस अशा प्रकारे तपासू शकता.
अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
आता, पेजच्या उजव्या बाजूला ‘नो युवर स्टेटस’ टॅबवर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा कोड भरा आणि ‘डेटा मिळवा’ पर्याय निवडा.
यानंतर तुम्हाला तुमच्या टॅबच्या स्क्रीनवर संपूर्ण स्टेटस दिसेल.