1.डोरमेंट अकाउंट
डोरमेंट अकाउंट हे असं अकाउंट असतं ज्यात 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार करण्यात आला नाही किंवा झाला नाही. अशी इनएक्टिव अकाउंट हॅकर्ससाठी संधी असते, त्यामुळे अशा बँक खात्याचा वापर करून हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करतात, किंवा बँकेची फसवणूक करतात.
2. इनएक्टिव अकाउंट
इनएक्टिव अकाउंट ही अशी अकाउंट आहेत ज्यात ठराविक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर झालेले नाहीत. ही खातीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3. झिरो बॅलन्स अकाउंट
ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून रक्कम जमा झालेली नाही आणि ज्यांची शिल्लक रक्कम शून्य आहे अशी अकाउंट देखील बंद करण्यात येणार आहेत. ग्राहक आणि बँकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, आर्थिक रिस्क कमी करणं, डिजिटल बँकिंगचा वापर वाढवणं, केवायसी मजबूत करणे, ग्राहकांची ओळख आणि नियमांचे पालन योग्य पद्धतीनं सुरू ठेवणं हे मुख्य हा निर्णय घेण्यामागचा उद्देश आहे.
ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी
तुमचं बँक खातं बंद असेल तर तातडीनं सुरू करा. खातं दोन वर्षापर्यंत बंद राहणार नाही याची काळजी घ्या, जर बंद झालं असेल तर तातडीनं केवायसी करून पुन्हा सुरू करा, वेळोवेळी आपल्या खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करा. आपलं बँक खातं सुरू राहील याची काळजी घ्या. बँकेनं ठरवून दिलेल्या नियमानुसार किमान रक्कम खात्यावर शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. ऑफलाईन बँकिंग तर आहेत पण तुम्ही डिजिटल बँकिंगच्या सुविधेचा जास्त वापर