नमो ड्रोन दीदी योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे.ड्रोनच्या वापरामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक गोष्टींचा वापर करता येणार आहे. यामुळे शेतीला खूप फायदा होणार आहे.२०२३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित महिलांना १५००० रुपये दिले जातात. ज्या महिला ड्रोन दीदी म्हणून काम करतील त्यांनाच हे मानधन मिळणार आहे.याचसोबत सरकार महिलांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सब्सिडीदेखील देते. सरकार ड्रोनच्या किंमतीची ८० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ८ लाख रुपये अनुदान म्हणून देते. याचसोबत उरलेल्या रक्कमेसाठी कर्जदेखील उपलब्ध करुन दिले जाते. या कर्जाची परतफेड फक्त ३ टक्के व्याजदराने करावी लागणार आहे.या ड्रोनच्या मदतीने बचत गट दरवर्षी अतिरिक्त १ लाख रुपये कमाई करु शकतात. या ड्रोन किटमध्ये एक ड्रोन बॉक्स, चार अतिरिक्त बॅटरी आणि चार्जिंग हब मिळणार आहे.