1880 पासूनचे जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार पाण्यासाठी पुढील प्रक्रीया
Land record 2023 पाहण्यासाठी पुढील साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार पाहू शकता.
aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जा.
पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर ‘महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
त्यात उजवीकडील ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करून मराठी भाषेचा पर्याय निवडा.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर लॉगीन आयडी आणि पासवर्ड आयडी टाकून तुमच्या नावाची नोंदणी म्हणजेज रजीस्ट्रेशन करा.
रजीस्ट्रेशन करताना तुम्हाला पेजवर वैयक्तिक माहिती भरावी लागेल उदा. नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर इत्यादी.त्यानंतर तुमची इतर माहिती देखील तुम्ही त्यात भरा. तुम्ही व्यवसाय काय करता, मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाना भरा. आणि पुढे Captcha चौकटीत टाईप करा. व सबमिट बटण दाबा.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
तुमचा गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते. त्यात जमीनीच्या सातबारामध्ये फेरफार केल्याचे वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार पाहायचा असेल तो तुम्ही पाहू शकता.