माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात.
या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जमा झालेले असतात.