‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे या सुविधा उपलब्ध होणार
१) ई-करार नोंद.
२) बोजा चढविणे/गहाणखत.
३) बोजा कमी करणे.
४) वारसा नोंद.
५) मृताचे नाव कमी करणे.
६) अज्ञान पालन कर्ता शेरा कमी करणे.
७) एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे.
८) विश्वस्तांची नावे बदलणे.
९) खातेदारांची माहिती भरणे.
१०) हस्तलिखित व संगणीकृत तफावत संबंधीचे अर्ज.
११) मयत कुळाची वारस नोंद.

१००% टक्के अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाइनद्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

अर्जदाराने केलेल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हे प्रत्येक अधिकाऱ्यासह संबंधित अर्जदारालाही कळू शकेल. यातून कारभारात पारदर्शकता येणार आहे.