12 वीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपर्यंत लागणार 12वीचा निकाल April 25, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. परीक्षा पार पडल्यावर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना आहे.यंदा 12वी आणि 10वीच्या परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे पाहता येईल? त्यामुळे निकाल नेमका कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. याच निकालाच्या तारखेच्या संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 12वीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपत आले असल्याने आता निकालाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनूसार, 12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे किंवा त्याच्या आसपास जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या निकालाच्या तारखेसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या काळात आयोजित करण्यात आली होती. या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील 15,05,037 विद्यार्थ्यांनी 3373 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली होती. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे पाहता येईल?