लाडक्या बहिणींनो तुम्ही जर साध्या कागदावर जरी अर्ज करुन गॅस एजन्सी किंवा गॅस वितरकाकडे दिला तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाऐवजी तुमच्या नावावर गॅस कनेक्शन बदलून घेता येईल आणि तुम्ही अन्नपुर्णा योजनेतील मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळवू शकाल. सुरुवातीला तुम्हाला या गॅस सिलिंडरसाठी पैसे द्यावे लागतील पण शासनाचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे.

महायुती सरकारने विधानसभेत 28 जूनमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनांबाबत घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या काही घोषणांमध्ये एक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेने अनेक गरीब, होतकरु आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना आधार दिला, यासह समाजातील सर्वच जनसामान्यांना मोठा आधार या योजनेने मिळाला.देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटूंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-2016 मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे.मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ कुटुंबांना लाभ देण्यावर सरकारने जोर दिला आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात यासंदर्भात भूमिका महायुती सरकारने या योजनेचा उद्देशही सांगितला आहे तसेच ही योजना पर्यावर संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरणार आहे . या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत उलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.