आपले आधारकार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे कसे पहावे?
बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
तसे नसल्यास महिलांना लाभ मिळत नाही. त्यासाठी महिलांनी आपले ‘बँक सिडिंग’ स्टेटस चेक करावे.
बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
वरील वेबसाईटवर आधारकार्ड नंबर टाकून कॅपच्या टाकून लॉगीन करा.
त्यांनतर आधार सिडिंग स्टेटस मध्ये जा.
यात तुम्हाला तुमचे आधार कोणत्या बँकेला सीड आहे ते पाहता येईल.
त्यानंतर तुम्ही इथे जी बँक दाखवत त्या बँकेत पैसे आलेत का ते पहा.
आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करणे जरुरीचे आहे.
त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.