दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयार रहा! मे महिन्यात ‘या’ तारखेला लागणार निकाल April 19, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांची निकालाची प्रतीक्षा लककरच संपणार आहे कारण निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे बघायचा महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल येत्या १५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.दहावी आणि बारावीची परीक्षा होऊन एक महिना झाला. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी टेन्शन फ्री झाले होते पण आता लवकरच निकाल लागणार असल्यामुळे ते चिंतेत देखील आले आहेत. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी जोरदार सुरू आहे. पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. अशामध्ये निकालची तारीख देखील समोर आली आहे. येत्या १५ मे रोजी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही शक्यता वर्तवली आहे.साधारणत: बारावीचे निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतात. मागच्या वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी लागला होता. तर दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. पण यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तयार राहावे असे सांगितले जात आहे. येथे क्लिक करून बघा निकाल कुठे बघायचा