सर्वात प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करा.
– आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरून सबमिट करा.
– आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
– Bank Seeding Status वर क्लिक करा.
– तुमचे आधार कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे याची माहिती मिळवा.
तसेच, तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामार्फतही आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नोंदवून प्रक्रिया पूर्ण करता येते.
UIDAI कडून 14 सप्टेंबर 2025 पर्यंत विनामूल्य आधार पत्ता दुरुस्तीची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना आधारमध्ये पत्ता किंवा इतर माहिती बदलायची आहे, त्यांनी लवकरात लवकर सुधारणा करून ठेवावी.
दरम्यान, सरकारच्या योजनांचा लाभ वेळेवर आणि थेट बँक खात्यात मिळण्यासाठी आधार लिंकिंग ही अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. नागरिकांनी लवकरात लवकर आपले खाते आधारशी संलग्न करून त्रासमुक्त बँकिंगचा लाभ घ्यावा आणि सरकारी योजनांचा फायदा नियमितपणे मिळवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.